विधान परिषद निवडणूक; एकनाथ खडसेंना ‘ते’ मत मिळणार

0
42

जळगाव : आगामी विधान परिषद निवडणुकीत (election) भाजप (bjp) पुन्हा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विधान परिषद उमेदवारी दिली असून त्यांना निवडून येण्यासाठी तीन ते चार मतांसाठी कंबर कसावी लागणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातून भाजप आमदाराचे एक मत मिळणार असल्याचे निश्चित मानली जात आहे. तर इतर दोन तीन मतांसाठी रणनिती आखली जात आहे. असे संगितले जात आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहे. ही निवडणूक २० जूनला होणार असून पक्षीय बलाबल पाहता भाजपचे व महाविकास आघाडीत जोरदार टक्कर होणार असल्याचे चित्र आहे. यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना तिकीट मिळाले असून खडसे समर्थक आमदारांचे मत मिळवण्यासाठी रणनीती आहे.

खडसेंनी अनेकांना आमदार बनविले

भारतीय जनता पक्षात असताना एकनाथ खडसे यांनी अनेकांना आमदार बनण्यास मदत केली. यात जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील तसेच विदर्भातील काही आमदारांचा समावेश आहे आहे. त्यांनी काही जणांना इतर पक्षातून भाजपात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देवून निवडून आणले. त्यामुळे आता खडसेंना कोणाची साथ मिळते याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.

गुप्त पद्धतीने मतदान

विधान परिषद निवडणूक मतदान हे गुप्त पद्धतीने होणार असल्याने फाटाफूट झाल्यास कोणाला समजणार नसल्याने आमदारांचे भाव चांगलेच वधारले आहे.

भाजपची रणनिती तयार

भाजपने विधान परिषदेसाठी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन, आशिष शेलार यांच्याकडे धुरा दिलेली आहे. मविआतील नाराज आमदार व अपक्ष आमदारांचे मत आपल्या बाजूने वळविण्यासाठी रणनिती आखली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here