द पॉईंट नाऊ ब्युरो : राज ठाकरे जर मला कधी विमानतळावर भेटले, तर त्यांना दोन हात करत हिसका दाखवेन असे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा घोषित केला होता. मात्र, राज ठाकरे हे जोवर उत्तर भारतीयांची माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशारा ब्रजभूषण सिंह यांनी दिला होता. आता त्यांनी केलेल्या या नव्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मी सहा वेळा खासदार राहिलो आहे. मी पक्षाचच काम करत आहे. असं ब्रजभूषण सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांना दिलेल्या इशाऱ्याबाबत सांगितले.
मी 2008 पासुन राज ठाकरेंना शोधतो आहे. एखाद्या दिवशी जर ते मला विमानतळावर भेटले, तर मी नक्की त्यांच्याशी दोन हात करत त्यांना हिसका दाखवेन आणि धडा शिकवेन असं ब्रजभूषण सिंह म्हणाले आहेत.
आता ब्रजभूषण सिंह यांच्या या वक्तव्यानंतर मनसे याबाबत काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम