राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपतींना ऑफर देण्यात आली होती. त्यांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे शिवसेनेने आपला उमेदवारांची निवड केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली होते.
संजय राऊत २८ मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी राऊत यांची जाहीर सभा होणार आहे. २७ मे पासून पुढील ४ दिवसांसाठी शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत कोल्हापूरला जाणार आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून संभाजीराजे छत्रपती यांनी या विषयावर सध्यातरी मौन बाळगल्याने संजय राऊत सभेतून कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. राऊत पुढे संजय राऊत म्हणाले , पण मी तुम्हाला माहिती देतो दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. दोन्ही जागी शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील. कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत. ते कडवट शिवसैनिक आहेत. ते एक मावळा आहेत. मावळे असतात म्हणून राजे असतात, असं संजय राऊत म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम