द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या हत्येप्रकरणी किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. हेमंत करकरे यांची हत्या कोणाकडून करण्यात आली ? असे प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित काही व्यावसायिकांचे हेमंत करकरे यांच्या हत्येमध्ये आरोपी असलेल्या सोबत संबंध आहे असा गंभीर आरोप केला. ते २४ मे मंगळवार रोजी पुण्यात घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत हे बोलले.
किरीट सोमय्या माध्यमांशी बोलताना असे म्हणाले, “मी फार जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक हे सांगतोय की नवाब मलिकांचे संबंध जर दाऊद गँगपर्यंत पोहचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या भागिदारांचे संबंध कसाबपर्यंत नक्कीच आहेत. त्यांचे संबंध कसाबचे कट त्यात करणाऱ्या लोकांपर्यंत आहेत. उद्धव ठाकरे व ठाकरे परिवाराशी व्यावसायिकरित्या ओळख असणाऱ्यांचा संबंध हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्यानसोबत असल्याचे ते म्हणाले. ”
“हेमंत करकरेंच्या हत्येला दोन कारणं आहेत. ही हत्या जरी कसाबच्या सहकाऱ्यांनी किंवा पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केली. मात्र तरी, हेमंत करकरे यांचा मृत्यू बुलेट प्रुफ जॅकेट तकलादू असल्याने झाला. बुलेटप्रुफ जॅकेट बोगस होत त्यामुळे हा मृत्यू झाला. या बुलेटप्रुफ जॅकेट विमल अग्रवाल करून पुरवठा केला गेला होता. त्याच्या चौकशी केली गेली त्यासाठी कमिट्यादेखील नेमल्या गेल्या. विमल अग्रवाल त्याला अटक पण झाली,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
“ज्या विमल अग्रवाल त्याल बोगस बुलेटप्रुफ जॅकेट दिल्या प्रकरणात अटक झाली. त्यानंतर यशवंत जाधववर चौकशी करता कमिटी नेमली गेली. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरे यांचे ‘उजवे हात’ म्हणून ओळखले जातात. जाधवांनी एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जमवली आहे,” असा आरोप सोमय्या यांनी केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम