सहावा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल, संजय राऊत

0
14

सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढवणार आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. सर्वांचे लक्ष राजकीय वर्तुळात लागले आहे. यातच आता शिवसेना कट्टर शिवसैनिकांना पदाधिकाऱ्याला राज्यसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे.

आम्‍ही छत्रपती घराण्‍याचा मान राखला आहे. छत्रपती घराण्‍याचा मान आहे म्‍हणूनच संभाजीराजे यांना शिवसेनेने राज्‍यसभेची उमेदवारी देवू केली आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले. सहावा उमेदवार हा शिवसेनेचाच असणार अशी आमची भूमिका असल्‍याचा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला. याबाबत मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतली.

खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता  म्हणाले की, शिवसेना दोन जागा लढवणार आहे. दोन जागा लढवणं हा राजकीय अपराध नाही. शिवसेना राजकीय पक्ष आहे. मराठी माणुस आणि हिंदुत्वाचे फार मोठी संघटना आहे. शिवसेना राजकारणात अनेक वर्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अशा वेळेला जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका ६ जागांसाठी होत आहेत. त्यातील २ जागा शिवसेना लढत आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आम्ही देऊ आणि निवडून आणू अशी शिवसनेची भूमिका असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here