दिवसभर कुठेही असलो तरी संध्याकाळी एकत्र असायचो, शरद पवार 

0
30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. यावेळी बाळासाहेबांच्या छायाचित्रांमधील अनेक आठवणी यावेळी शरद पवारांनी सांगितल्या.

१८ मे रोजी बीमुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शरद पवार बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. शरद पवार यांनी बाळासाहेबां बरोबर च्या अनेक आठवणी सांगितल्या, मला आठवतंय, मी पूर्वी खेडगल्ली, दादर मध्ये रहायला होतो. त्याच काळात नुकतीच शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली होती. ज्यावेळेस राजकारणात माझ्या खांद्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली.

त्याकाळात शिवसेनेचा महाराष्ट्रभर प्रसार होता. आम्ही दोघांनीही भाषणांमधून एकमेकांवर खूप टीका केली. आम्ही दिवसभर कुठेही असलो तरी संध्याकाळी एकत्र असायचो. मीनाताई आमच्या आवडीचं जेवण बनवायच्या, तासन् तास आमच्या गप्पा चालायच्या, काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हायची. अशी भावनिक आठवण शरद पवारांनी सांगितली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here