पुणे येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या असताना महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. महागाईच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
वाढत्या महागाई संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिलानी आंदोलन केले. मोठ्या संख्येने गर्दी करून जोरदार घोषणाबाजी केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून बालगंधर्व रंगमंदिर परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्मृती इराणी हॉटेल वर पोहचण्या आधीच मोठी घोषणाबाजी करत महागाईच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
महागाई विरोधात इराणी यांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून प्रयत्न करण्यात आला, चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिलांनी यावेळी केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकारी वैशाली नावडे याना मारहाण केली. यावेळी दोन्ही पक्षात झटापट झाल्याचं देखील दिसून आलं.
यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना रोखलं. कार्यकर्त्यांकडून मोठा सवाल केला जात आहे कडेकोट बंदोबस्त असताना देखील राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या आत मध्ये कशा आल्या हा प्रश्न निर्माण झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम