अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांनी अनेकदा चर्चेत आली आहे. तर केतकीनं आता सरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रक काढून केतकी चितळेचा निषेध नोंदवला आहे.
कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. भावे वगैरे असं नाव टाकलं हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत कुठेही जागा नाही. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त वर्षे कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध भावेनं हे लिहिणं साफ चुकीचे आहे .ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे इथे फार स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. असे लिहिणे ही एक प्रवृत्ती नव्हे, तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.
चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी, तसेच असंख्य बुद्धिमान विचारवंतांनी आपल्याला शिकवलं. कोणीही या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा.” या शब्दात मनसेचे राज ठाकरे यांनी केतकीला सुनावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील तिला अटक केल्याची माहिती दिलेली आहे. ठिकठिकाणी केतकीविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम