मुंबईहून पुणे दिशेने मार्गवर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांचा छोटा अपघात झाला असून वाहनांची रांग लागली आहे. त्यामुळे वाहने ही संथगतीने पुढे सरकत आहेत. मुंगी बस वाहनांची कोंडी झाल्याने पर्यटक संतप्त झाले आहेत. खडांळा लोणावळा दिशेनं आणि मुबंईच्या दिशेने वाहतुक धिम्या गतीने चालू आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या द्रुतगती मार्गावर शुक्रवारी टेम्पोचा छोटा अपघात झाला होता. बोरघाटातील ट्रॅफिक पोलिस चौकीजवळ ट्रक आणि ट्रेलरची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे वाहनांना अडथळा निर्माण झाला. एक्स्प्रेसवेवर वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शनिवार देखील प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
मुंबईवरुन पुणे, लोणावळा आणि महाबळेश्वर इथे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे खालापूर टोलनजीक आणि बोरघाटात अमृकांजन पुलाजवळ वाहनांची सुमारे अर्धा किलोमीटर रांग लागली आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस अशात सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी जोडून आली आहे.
सलग तीन सुट्ट्यांचे आनंद घेण्यासाठी पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. वाहतूक कोंडीत वळणावर अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे छोट्या वाहन चालकांना वाहतूक कोडींचा त्रास सहन करावा लागत आहे ,त्यामुळे सलग दोन दिवस मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनं धीम्या गतीने जात आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम