दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील ही इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडल्याचं समोर आली. तीन मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्सला असा इमारतीचा नाव आहे. या भीषण आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
शुक्रवारी संध्याकाळी मुंडका येथील तीन मजली इमारतीला आग लागली. आग लागली तेव्हा या कार्यालयांमध्ये अनेक लोक उपस्थित होते. पहिल्या मजल्यावर आग लागली पसरत ती वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. अनेकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण आगीनं भीषण होती. जीव वाचवण्यासाठी इमारतीतून बाहेर उड्या घेत आपला जीव वाचवला. सुरुवातीला पहिल्या मजल्यावर आग लागली नंतर वेगानं ती वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली.
आग लागल्याची माहिती अग्मिशमन दलाला मिळाली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी 30 अग्मिशमन गाड्यां उपस्थित झाला. इमारतीच्या मजल्यावर कोणी अडकून पडले असेल तर त्यांना वाचवण्यासाठी अग्निशामक दल कार्यरत आहे. युद्धपातळीवर ही आग विझवण्याचं काम सुरु असून अद्याप 27 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. या भीषण आगीतून 150 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. 19 जण बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम