मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली होती. आता ११ दिवसानंतर राणा दाम्पत्याला जामीन मिळाला.
आज राणा दाम्पत्याने नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्येक सभेत आपण मर्द असल्याचं सांगतात. मात्र नवनीत राणा महिलेला तुरुंगात टाकून त्यांनी नामर्दासारखं काम केलं आहे. दिवंगत बाळासाहेबांना हे पाहून दु:ख होत असेल आणि विचार करत असतील की कोणाच्या हातात शिवसेनेचा कारभार गेला आहे” असं म्हणत अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचकपणे टीका केली आहे.
जामीन मिळाल्या नंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर देखील जोरदार टीका देखील केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली आहे. म्हणून हनुमान चालिसा वाचली. पण कोर्टाने आज कायद्याला स्थगिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि किरेन रिजीजू यांचे मी आभार मानतो. ठाकरे सरकार इंग्रजांचे कायदे पाळतं हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. आम्ही कोर्टाचा आदर करतो. केंद्र सरकारचे आभार मानतो.’असं रवी राणा म्हणाले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम