तळेगाव शिरूर तालुक्यात ढमढेरे येथील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी अजय पोखर्णा व सचिन मेटे घराला आज दुपारी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तळेगाव ढमढेरे येथील मुख्य पेठेतील घराला आग लागल्याने सर्वाची धावपळ झाली. अरुणाच्या जळत घराला आग लागल्याने दूरवर आगीचे चटके जाणवत होते. आग लागलेल्या घराच्या आजूबाजूचा परिसर गजबजलेला असल्याने भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक पाण्याचे टँकर व ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले. दुर्घटना स्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली.
इमारतीच्या वरच्या मजल्यावर आगीचे लोट आणि धुर पसरला होते. आजूबाजूच्या नागरिक, पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी योग्य वेळेत तातडीने दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली.आगीचे कारण अद्याप समजले नाही. तब्बल दोन तास चाललेल्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम