शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही, अजित पवार

0
94

नेहमीच शेतकरी अधिक संकटात असतात. कधी अवकाळी पाऊस तर शेतमालाची नुकसान, यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही , असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विधानभवन येथे आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ऊस शेतीसाठी पाणीपुरवठा अधिक लागत असल्याने त्याऐवजी सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न मिळून देणारा पिकांकडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्याकरता कृषि विभागाने त्यादृष्टीने प्रयत्न करावे. अनेक जिल्ह्यांत रेशीम व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात असून चांगले उत्पन्न मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकरी अधिक तर या व्यवसायाकडे वळत असल्याचे अजित पवारांनी सांगितलं.

ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी असल्याने गाळप बंद झालेल्या कारखान्यांवरील हार्वेस्टर इतर क्षेत्रातील ऊसतोडणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी. शेतातील ऊसाच्या वाहतुकीसाठी आणि तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकार मदत करणार असल्याचे जाहीर केले सांगितले. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कृषि निविष्ठांचा पुरेसा पुरवठा करावा असे देखील म्हणाले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here