LIC इमारतीला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनस्थळी दाखल.

0
27

मुंबई प्रतिनिधी : मुंबईतील सांताक्रूझमध्ये एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचं प्राथमिक वृत्त असून धुराचे लोट बाहेर येत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघणाऱ्यानी गर्दी केली आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दल देखील याठिकाणी दाखल झाले आहे. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे माहिती समोर आली नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here