अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शुक्रवारी दि.६ हे रोजी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लिलावती रुग्णालयात खा. नवनीत राणा यांची भेट घेतली. राणा दाम्पत्याच्या या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर फोटो पोस्ट करत महाआघाडी सरकारवर निशाणा साधला.
शांतता भंग केल्याच्या व राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दांपत्याला पोलिसांनी अटक केली. नवनीत राणा जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ भेट घेतली. भेटी नंतर चित्रा वाघ यांनी एक ट्विट पोस्ट केली यांनी लिहले ,
एका महिला खासदाराला ठाकरे सरकारने दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले व मनात संतापाचा डोंब उसळला. हनुमानाचं नाव ऐकून फक्त रावणंच एवढा सूडाने पेटला असेल, अशी खोचकपणे टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल. नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत, हे सरकार ने विसरू नये.असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे व महाआघाडी सरकारला चित्रा वाघ यांनी दिला आहे.
11 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर अखेर बुधवारी राणा दांपत्याला सशर्त जामीन मंजूर झाला. कारागृहातून सुटका होताच मानेच्या त्रासामुळे नवनीत राणा उपचारासाठी लीलावती रूग्णालयात दाखल केले.बुधवारी सायंकाळी पर्यंत न्यायालयाचे आदेश कारागृहात न पोहचल्यामुळे त्यांना बुधवारची देखिल रात्र तुरुंगातच काढावी लागली होती. यानंतर त्यांना गुरुवारी तुरुंगातून सोडण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम