शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव का घेत नाही; भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल

0
10

राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील सभेत लोकमान्य टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामी यांचे गुणगान गाण्यासाठी सभा घेतली होती, पवार साहेबांना जातीयवादी ठरविण्यासाठी सभा होती, अशा शब्दांत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर असताना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना सवाल आहे. शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहे, ते शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? द्वेष वाढविण्याचा प्रकार योग्य नसल्याचा सल्लाही त्यांनी यावेळी राज ठाकरे यांना दिला.

ते पुढे म्हणाले कि, राज ठाकरे यांनी मांडलेला इतिहास खोटा आहे, राज यांनी इतिहास समजून घ्यावा , 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले, त्यावेळी संभाजी महाराज यांनी समाधी बांधली, त्यानंतर किल्ला मोगलांच्या ताब्यात असताना पेशव्यांनी तो जिंकला. 1773 ते 1818 समाधी उल्लेख कुठेही नाही, पेशव्यांनी सुद्धा समाधिकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरच्या काळात 1869 मध्ये महात्मा फुले यांनी समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली.

 त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते. टिळकांनी सुद्धा समाधी चांगली बांधावी, यासाठी फंड काढला, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी या नावाने निधी गोळा केला. उभ्या हयातीत टिळक यांनी एक खडा सुद्धा बसवायला नाही. पुढे 1926 ला इंग्रजांच्या फॉरेस्ट समितीने टिळकांना पत्र लिहुन निधींचे काय झाले विचारले, ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बँकच बुडाली. त्यानंतर इंग्रजांनी शिवाजी महाराज यांचे चौथरा आणि छत्र बांधले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here