राणा दाम्पत्यांच्या कोठडीतील मुक्कामात वाढ; जामीन अर्जावर बुधवारी होणार सुनावणी

0
14

मुख्यमंत्र्यांच्या घरावर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत आले. त्यानंतर शिवसैनिक कार्यकर्ते आक्रमक झाले समाजात वातावरण चांगले खवळले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. या निर्णयामुळे राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसाचे पठण करू असे आवाहन केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत असणारे राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्कामात वाढ झाली आहे.खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना 24 एप्रिल 2022 रोजी वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गेल्या 9 दिवसांपासून राणा दाम्पत्या कोठडीत आहे. निकाल लिहून पूर्ण न झाल्याने बुधवारी सकाळी न्यायालय निकाल जाहीर करणार आहे.

मंगळवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने बुधवारी सकाळी न्यायालय निकाल देणार आहे. 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल असं वर्तन करणं, 353 कलमाअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल आहे. सरकारी कामात व्यत्यय आणल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होतो. राणा दाम्पत्यावर 124 A कलमाअंतर्गत कारवाई होईल सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here