राज ठाकरेंच ४ तारखेच नवीन अल्टीमेटम ; हे भोंगे उतरले गेलेच पाहिजे!

0
111

राज ठाकरेंच ४ तारखेच नवीन अल्टीमेटम ; हे भोंगे उतरले गेलेच पाहिजे!

  मुंबई प्रतिनिधी :  राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार ह्या कडे सर्वांचच लक्ष होत .   

          गुढीपाढव्याच्या सभेत काढलेल्या भोंग्याच्या प्रश्ना विषयी बोलताना राज यांनी ‘ लाऊडस्पिकर हा फार जुना विषय आहे . मी लाऊडस्पिकर चा विषय काढला नाही , मी फक्त त्याला चालना दिली ‘  तर , लाऊडस्पिकर हा सामाजिक विषय आहे त्याला धार्मिक करू नका नाहीतर धर्मानेच उत्तर मिळेलं ‘  ” हे भोंगे उतरलेच पाहीजेत ! ” असे म्हणत लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील अनधिकृत भोंगे उतरवावे असे आव्हान त्यांनी केले . तर  ‘ भोंगे उतरले नाहीत तर आम्ही मशिदीं बाहेर हनुमान चालीसा लाऊडस्पिकर वर लावू ‘ असा इशाराही सरकारला दिला आहे .

         तसेच  लाऊडस्पिकर तुमच्या धर्मात बसत नाही . मला जातीपातीच राजकारण करायच नाही परंतु , ऐकणार नसाल तर काय ते एकदा होऊन च जाऊ देत ! . सरळ मार्गाने ऐकत नसल्यास महाराष्ट्राच्या मनगटातली ताकद दाखवू . ह्या शब्दात आपली भोंग्यांच्या प्रकरणातली पुढची भूमिका स्पष्ट केली . तसेच पोलिसांना ही ‘ लवकरात लवकर भोंगे उतरवा नाही ऐकल्यास बोळे कोंबा ‘  असे म्हणत कारवाई करण्यास सांगितले . ३ मे ला ईद आहे मला त्यांच्या सणात विष कालवायच नाही तोपर्यंत वाट बघा पण ४ मे पासून एकणार नाही , हनुमान चालीसा लागलीच पाहिजे. असे म्हणत सरकारला नवीन आव्हान त्यांनी आजच्या भाषणात दिले . जर उत्तर प्रदेश मध्ये लाऊडस्पिकर हटवले जाऊ शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही ? भोंग्यांचा हा रखडलेला प्रश्न आता सुटलाच पाहिजे . असे आव्हान त्यांनी जनतेला केले . थोडक्यात राज ठाकरेंनी सरकारला ४ मे पर्यंतचे नवे अल्टीमेटम आजच्या भाषणात दिले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here