भोंग्याच्या आणि हिंदुत्वाचा भूमिकेवरुन मनसे आणि ठाकरे सरकारमध्ये जोरदार चढाओढ पहायला मिळत आहे. सगळ्यांच्या नजरा आज राज ठाकरेंच्या सभेकडे लागून आहेत. राज ठाकरेंच्या सभेआधीच राज्यातील वातावरण पेटलं आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हल्लाबोल केला आहे.
आरोप केला जात आहे, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही, त्यावेळी भाजपने बाळासाहेब ठाकरे यांना वेळोवेळी कसे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे मी नाही म्हटलं तरी थोडासा धुर्तपणे भाजपासोबत वागतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. मी भोळा नाही. माझे वडील भोळे होते. त्यांनीच माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवलं आहे, पण हिंदुत्वाच्या आडून भाजप त्यांचे जे डाव साधत होता त्याकडे बाळासाहेब कानाडोळा करत होते, मी तसं करणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला हिंदुत्वाचा डंका वाजवण्याची गरजही नाही, असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले, हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे लक्ष देत नाही. असे खेळ खूप पाहिलेत,असे टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी सभेआधीच सोडलं आहे. सर्वच ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे, असा अंदाज आहे. आज होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार, कोणते नवे मुद्दे मांडणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम