1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा घेणार आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुंबईत आज बुस्टर डोस सभा घेणार आहे.जवळपास दहा हजार कार्यकर्त्यांना बूस्टर सभेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस उपदेश करणार आहेत.
१मे आज संध्याकाळी मुंबईच्या सोमैया मैदानावर बूस्टर डोस ही सभा होणार असून, राज्यातील सर्वच महत्त्वाचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. १ मे दिनानिमित्त औरंगाबाद व मुंबई येथे जाहिर केलेले दोन्ही सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करणार आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या निशाण्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, आता ही सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. शिवसेनेकडून होणारा भ्रष्टाचार सांगण्यासाठी संपूर्ण मुंबईभर भारतीय जनता पक्षाकडून ‘पोलखोल’ यात्रा सुरू करण्यात आली होती. दोन कट्टर विरोधक महाविकास आघाडीला आज घेरणार आहेत.
सध्या गाजत असलेले हनुमान चालीसा आणि भोंग्याच्या प्रकरणावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या सभेच्या माध्यमातून केला जाण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम