Saptashrungi Devi Gad| ५० हजार भाविक घेतायेत भगवतीचे दर्शन, सप्तमीनिमित्त भाविकांची संख्या अजून वाढण्याची शक्यता

0
22

Saptashrungi Devi Gad : सप्तृशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे, तरी शुक्रवारी सहाव्या माळेला सप्तृशृंगी गडावर  ५० हजारांवर भाविक भक्तांनी दर्शन घेतले.

आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर सकाळी सात वाजता देवीच्या अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवीच्या उत्सव मूर्तीची पंचामृत महापूजा सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त भूषणराज तळेकर यांनी केली. अध्यक्ष तसेच विश्वस्त मंडळाच्या निर्णयाप्रमाणे दर्शनासाठी आलेले न्यायडोंगरी (ता. नांदगाव) येथील भाविक ईश्वर वाघ यांना पूजेचा मान देण्यात आला. दुपारी बारा वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीत देवीची नैवेद्य आरती पार पडली. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त तसेच तहसीलदार रोहिदास वारुळे, तसेच इतरही मान्यवरांनी यावेळी आई भागवतीचे दर्शन घेतले.

Agriculture| सोयाबीन आणि मक्याचे दर ढासळले; शासकीय खरेदी सुरू नाहीच, शेतकरी वर्गात संतापाची लाट..

ट्रस्टच्या अन्नपूर्णा प्रसादालयात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे वाटप होत आहे. पहिल्या माळेपासून भाविकांचा सुरू झालेला ओघ शुक्रवारी सहाव्या माळेला मात्र,  आणखी वाढलेला दिसून आला. शनिवारी  दी. १७ रोजी सप्तमी असून, नवरात्रोत्सवातील हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. नाशिक जिल्ह्यासह, धुळे, नंदुरबार, नगर व गुजरात तसेच परराज्यातीलही हजारो भाविक पदयात्राकरून सप्तशृंग गडावर दाखल झालेले आहेत. तर, हजारो भाविक सप्तशृंग गडाकडे आई भगवतीचा जयघोष करीत मार्गक्रमण करीत आहेत.

यात महिलांचा मोठा सहभाग असून, वणी-नाशिक रस्ता हा यात्रेकरूंची गर्दी आहे. शनिवारी व रविवारी (दी. २२) गडावर उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणा, ट्रस्ट, ग्रामपंचायत, आणि राज्य परिवहन महामंडळाने त्याअनुषंगाने नियोजनदेखील केले असल्याचे माहिती देण्यात आली आहे.

तिसरी मुंबई! मेगा प्लान झाला तयार; रस्त्यांसाठी 12 हजार कोटींची तरतुद

शिवालय परिसरात वॉटरप्रूफ मंडपची उभारणी… 

कावडयात्रेसाठी येणाऱ्या भक्तांच्या निवासाची गैरसोय होऊ नये, म्हणून शिवालय परिसरात वॉटरप्रूफ निवारा मंडप उभारण्यात आले आहेत. भाविकांसाठी ठिकठिकाणी प्राथमिक उपचार केंद्रेदेखील सुरू करण्यात आली आहेत. भाविकांसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार व पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here