ठाकरे सरकारचा निषेध, चित्रा वाघांनी साधला सरकारवर निशाणा

0
16

मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रकार कायम असून मागील तीन महिन्यांमध्ये २३३ शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून अखेर आत्महत्या केली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७१ आत्महत्या बीड जिल्ह्यातील आहेत. या मुद्द्यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’मराठवाड्यात गेल्या ३ महिन्यात २३३ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सातबारा रिकामी करण्याच्या हेक्टरी ५० हजार मदतीच्या मोफत विजेच्या मारलेल्या थापांच्या भुलभुलैयात फसलेल्या बळीराजाची ही शोकांतिका आहे. ठाकरे सरकारचा निषेध’, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

भाजप शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप नेहमी चालूच असतात बळीराजाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांना सरकारवर टीका केली आहे.येत्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.भाजप मनसेवर तुटून पडा सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या… इति मुख्यमंत्री जी. तुम्ही तुटून पडा मी घरातुन बुळबुळीत टोमणे मारेन, असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. भाजप मनसेशी युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here