Budget2023: अर्थसंकल्पात Pan Card विषयी मोठी घोषणा

0
21

नवी दिल्ली :  2023-24 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Budget 2023)केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले. पुढच्या तीन वर्षांत केंद्राकडून ३८,८०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

पॅन कार्डचा(Pan Card) वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये ओळखपत्र(Identity Card) म्हणुन केला जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. याच बरोबर युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सुतराम यांनी हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार तसेच मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना आणली जाणार आणि युद्धपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगीतले.

हा अर्थसंकल्प देशाच्या अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षी भारतात देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांचा कल वाढला आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखील वाढल्या आहे.यामुळे पर्यटन व्यवसायामधून रोजगार निर्माण होऊ शकतात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.याचबरोबर सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास करणे हे सगळे सरकारचे प्राधान्य असणार असल्याचे यावेळी निर्मला सीताराम यांनी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here