Skip to content

18 वर्षीय विद्यार्थिनीने शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास


बीडयेथील अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडली आहे. गावातील एका तरूणाच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती आईने दिली. एकाच गावात राहणाऱ्या रोमिओवर गुन्हा नोंदवण्यात आला.

मुलगी दिपाली रमेश लव्हारे नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. वय १७ वर्षे आहे.दिपालीची आईने सांगितले, मागील काही दिवसांपासून त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण दिपालीला कॉम्प्युटर क्लासला जात येत असताना छेडत, रस्त्यात अडवून वेडेवाकडे बोलणे, सतत त्रास देणं सुरूच होते.

याबाबत दिपालीने घरच्यांना सर्व सांगितले, दिपावलीच्या वडिलांनी अकबरला बजावूनही, त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. त्याचे त्रास देणे सुरु असल्याचे दिपालीने आईला सांगितले होते. रोजच्या त्रासाला कंटाळून दिपालीने मंगळवारी रात्री आई गोंधळाच्या कार्यक्रमाला गेली असताना घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली.

रात्री ११ वाजताच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर पाहिले असता रडू कोसळले. नातेवाईकांच्या मदतीने दिपालीला स्वाराती रुग्णालयात नेले असता तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दिपालीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अकबर बबन शेखवर कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी तपास मोहीम सुरू केली आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!