17 सप्टेंबरपर्यंत, राणे निवांत ; कोणतीही कारवाई नाही

0
68

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : सध्याचे गाजत असलेले वादग्रस्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिलाय. राणेंनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. आणि तोपर्यंत नारायण राणेंवर कोणतीही कारवाई करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभर वातावरण तापलेले आहे. त्यामुळे भाजप मधील नारायण राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा राडा झाला होता. ठिकठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांद्वारे नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर नुकतीच केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. आणि राणे यांना त्वरित जामिन देखील मिळाला.

नारायण राणे यांनी त्यांच्यावर दाखल असलेले सर्व गुन्हे रद्द करावेत या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर १७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. आणि १७ सप्टेंबर पर्यंत राणे यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. यामुळे तोपर्यंत तर केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना दिलासा मिळाला आहे.
नारायण राणे तसेच त्यांच्या पुत्रांद्वारे आत्तापर्यंत अनेक वेळा शिवसेनेवर सडकून टीका करण्यात आली आहे. ह्यात अधिकाधिक वेळा वादग्रस्त वक्तव्यानेच राणे कुटुंबीयांनी शिवसेनेवर टीका केली आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून आत्तापर्यंत नेहमीच राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यात वाद झाले आहेत. आणि राणे यांनी केंद्रीय मंत्री झाल्यापासून बऱ्याच वेळा आपल्या वक्तव्यांनी लक्ष वेधलं होतं. त्यात प्रवीण दरेकर यांना तू थांब रे म्हणणं असो, शासकीय अधिकाऱ्यांना झापणे असो किंवा मग आत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य. यामुळे नारायण राणे यांनी शिवसैनिकांचा रोष ओढवून घेतला.

यामुळेच राज्यभर ठिकठिकाणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला.

आता कोर्टाच्या निर्णयाने वादात सापडलेल्या राणे यांना काहीसा दिलासा मिळालाय.
जवळपास दोन दशकात पहिल्यांदाच एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता येत्या १७ सप्टेंबरला न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here