दिल्ली – शिवसेनेतल्या फुटीची ढग आता दिल्लीच्या मार्गाने जात आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली राज्यातली आमदारांची बंडाळी आता खासदारांमध्ये दिसू लागली आहे. तब्बल १२ खासदार हे शिंदे गटात सामील होण्याची शक्यता असून त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच दिल्लीला रवाना झाले आहेत. ते उद्या आपल्यासोबत असलेल्या खासदारांसह पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदेगटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातच, राष्ट्रीय कार्यकारिणी निवडण्यात आल्याचे समजते. दुसरीकडे शिवसेनेचे १२ खासदार या बैठकीला ऑनलाईन हजर होते, अशीही माहिती पुढे आली आहे. त्यातच शिवसेनेचे सर्वच खासदार आमच्यासोबत आहेत, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.
अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर आता खासदारांचा मोठा गटही एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत. अनेकांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत शिंदे गटात सामील होण्याचे संकेत दिले असून त्यासाठी आग्रही असलेले अनेक खासदारांनी अनेकदा ऑनलाईन बैठका घेत राहिले. त्या १२ खासदारांमध्ये भावना गवळी, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे व अन्य खासदारांचा समावेश आहेत.
आमदारांच्या बंडानंतर खासदारांमध्येही बंड होण्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. त्यापैकी भावना गवळींची शिवसेनेने हकालपट्टी केली आहे. सध्या शिंदे गट भावना गवळींना लोकसभेच्या प्रतोदपदी तर राहुल शेवाळेंना गटनेतेपद देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम