देवळा : तालु्यातील उमराने येथे धक्कादायक प्रकार घडला असून जिथे आपली उपजीविका भागली तिथेच कामगाराने डल्ला मारला आहे. याबाबत माहिती अशी योगेश संजय ठाकरे यांचे कुंभार्डे येथे हॉटेल व्यवसाय होता हॉटेल मध्ये काम करणारा विश्वासू कामगार गोरक् आनंदा खैरनार रा.कुंभार्डे याला व्यवसायाची पूर्ण जबाबदारी दिली होती .
कोरोना काळात व्यवसाय बंद असताना हॉटेल मधून फ्रिज, लोखंडी काउंटर, किचन टेबल,4 टेबल12 खुर्च्या, गॅस शेगडी, गॅस टाकी, कडई, व इतर लहान वस्तू चोरी गेल्या आहेत. असे सांगितले परंतु चोरी झालेल्या वस्तू पैकी काही वस्तू गोरक ह्या कामगारांच्या राहत्या घरात दिसून आल्याने ती चोरी कामगार गोरक यानेच केली आहे असे उघडकीस आले.यात मदत करणार हिरामण शेवाळे रा.सांगवी ,आई विमल आनंदा खैरनार, व पत्नी संगीता गोरक खैरनार यांच्या विरुद्ध देवळा पोलिसांत् चौकशी, कारवाई कामी तक्रार अर्ज दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम