१ हे रोजी औरंगाबाद येथे मनसे राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे.मनसेचे राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत. राज ठाकरे यांचा ताफा आता पुण्याहून रांजणगाव पर्यंत पोहोचलेला आहे. पुण्याहून निघताना राज ठाकरे यांनी पुरोहितांचा आशीर्वाद घेऊन.
राज ठाकरे १०० ते २०० गाड्याच्या ताफ्यासंह औरंगाबाद कडे रवाना झाले आहेत. तर जागोजागी राज ठाकरे यांचे स्वागत देखील केले जाणार आहे अनेक ठिकाणी जंगी स्वागताची तयारी सुरू आहे. १०० पुरोहितांचा आशिर्वाद घेऊन, राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. पुण्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वढू बुद्रुक गावाजवळ थांबून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली वाहून राज ठाकरे यांचा दौरा औरंगाबादकडे रवाना होणार आहेत.
वढू बुद्रुक गावाजवळ हात जोडून संभू राजांना मानाचा मुजरा करून आपल्या सभी करता आशीर्वाद मागितले आहेत.आमीत ठाकरे यांकडून नियोजनाची पाहणी देखील करण्यात येत आहे. अमित ठाकरे यांनी आज सकाळी नियोजनाचा आढावा घेऊन माहिती दिली आहे.पुणे ते औरंगाबाद दरम्यान राज ठाकरे यांच्या जागोजागी स्वागताची तयारी मनसैनिकांनी केलीय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम