सिल्वर ओक हल्ला प्रकरणात; जयश्री पाटीलांना अटकपूर्व जामीन मंजूर

0
141

न्यायालयाच्या निकालामुळे जयश्री पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या विनंती करणा बाबत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी ॲड. जयश्री पाटील यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक करत हल्ला केला होता. या प्रकरणी जयश्री पाटील यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी ३० एप्रिल मुंबई सत्र न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हल्ला प्रकरणी आणखी तीन एसटी कर्मचाऱ्यांवर देखील जामीन मंजूर करण्यात आला.मागील सुनावणीवेळी त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला होता. शुक्रवारी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला.

७ एप्रिलरोजी सदावर्ते यांच्या इमारतीच्या छतावर मध्यरात्री झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचे नियोजन केले होते. या प्रकरणातील १११ आरोपींसह आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते यांनादेखील मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सर्व आरोपी जामिनावर सुटले आहेत. आता जयश्री पाटील यांनाही अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here