द पॉईंट नाऊ ब्युरो ; सर्वांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. आता कोरोनाचा अजून एक नवीन प्रकार सापडला आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा B.1.1.529 नावाचा नवीन प्रकार आढळून आला आहे.
त्यामुळे आता अजून भीतीचे वातावरण पसरले आहे.
जगभरात सुरुवातीला कोरोनाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने त्रस्त केले होते.
आता कुठे परिस्थिती पूर्व पदावर येते आहे. असे वाटत असतांनाच, कोरोनाच्या या नवीन प्रकाराने डोके दुःखी वाढवली आहे.
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या B.1.1.529 नवीन प्रकाराचे आत्ता पर्यंत 22 रुग्ण आढळलेले आहेत.
आधीच्या कोरोनाच्या प्रकारांनी आधीच त्रस्त असलेल्या, जगाला आता हा नवीन प्रकार त्रास द्यायला येऊन धडकलाय.
कोरोना ला सुरुवात झाल्या पासून आत्ता पर्यंत कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांनी संपूर्ण जगाला त्रस्त केले होते.
जगभरात कोरोनाच्या लसी साठी युद्ध पातळीवर संशोधन सुरू होऊन, त्यासाठीच्या लस उपलब्ध झाल्या आणि त्या नागरिकांना देण्याचे काम देखील सुरू झाले.
भारतात आत्तापर्यंत 100 कोटींहून अधिक कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत.
लस 100% तर नाही, परंतु चांगल्या प्रमाणात प्रभावी होत असल्याचे सगळी कडे दिसून आले.
मात्र कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना देखील कोरोना मुळे आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडून गेल्या.
त्यामुळे सर्वांनाच आधीच धडकी भरलेली आहे. आणि आता या नवीन प्रकाराने अजून डोके दुःखी वाढवली आहे.
जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
इंग्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, जर्मनी आदी देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकल्याने तिथे निर्बंध घालण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे.
अनेक ठिकाणी शाळा, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत.
या संकटाने अद्याप पर्यंत जगाची पाठ सोडलेली नाही. कोरोनाच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणावर जगभरात आर्थिक आणि मनुष्य हानी झाली आहे.
महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली. त्यामुळे इथे देखील चिंतेचे वातावरण आहे.
एकीकडे तिसरी लाट धुमाकूळ घालत असतांना, हा नवीन प्रकार समोर आला असताना, आता भारतात मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतय.
परंतु, या आंतरराष्ट्रीय उड्डानांमुळे भारतात या नव्या प्रकाराने शिरकाव करायला नको म्हणजे झाले.
आधीच कोरोनाने त्रस्त बरेच नागरिक अद्याप उपचार घेताय. आता हा नवीन प्रकार अजून धक्का देणारा आहे.
आता या नव्या प्रकाराने अजून काय होते? याने धडकी भरवली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] सर्वांना धडकी भरवणारी बातमी… […]