द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; 26 नोव्हेंबर रोजी देवळा येथील विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान तयार झाले. आणि यासाठीच 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो.
संपूर्ण देशभरात संविधानाचे महत्व प्रकट व्हावे, समजावे या दृष्टीने विद्यालयांमध्ये संविधान दिन साजरा केला जातो.
देवळा येथील श्री शिवाजी विद्यालयात संविधान दिना निमित्त विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन केले.
शाळेतील क्रीडा समुपदेशक तसेच वृक्ष मित्र सुनील आहेर यांद्वारे सामुदायिक उद्देशिकेचे प्रतिज्ञा रुपी सामुदायिक वाचन देखील करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला प्रदान केलेले संविधान विद्यार्थी मनावर बिंबवणे आवश्यक आहे. कारण विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य आहेत.
देवळा येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मध्ये सदैव विद्यार्थी हिरार्थ उपक्रम राबवले जातात.
याच पार्श्वभूमीवर संविधान दिनाचे महत्व लक्षात घेऊन विद्यार्थी वर्गाकडून संविधान वाचन करवून घेण्यात आले.
संविधान महत्व लक्षात घेऊन शासनाद्वारे संपूर्ण देशभर 23 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत.
वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, निबंधलेखन, पोस्टर व फलक लेखन अशा द्वारे “माझे संविधान, माझा अभिमान” हा उपक्रम राबविला जात आहे.
देवळा येथील देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मध्ये देखील विदयार्थी वर्गा सह हा संविधान i दिन साजरा केला गेला.
बऱ्याच कालावधीनंतर शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्गात उत्साह देखील आहेच.
त्याच अनुषंगाने, देवळा येथे हा संविधान दिन साजरा केला गेला.
या प्रसंगी मुख्याध्यापक दिलीप आहेर, पर्यवेक्षक अनिल आहेर, सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाद्वारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यावेळी अभिवादन करण्यात येऊन, हा संविधान दिन साजरा करण्यात आला.
ही बातमी वाचलीत का?
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा B.1.1.529 नावाचा नवीन प्रकार आढळून आला आहे.
त्यामुळे आता अजून भीतीचे वातावरण पसरले आहे.
जगभरात सुरुवातीला कोरोनाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने त्रस्त केले होते.
आता कुठे परिस्थिती पूर्व पदावर येते आहे. असे वाटत असतांनाच, कोरोनाच्या या नवीन प्रकाराने डोके दुःखी वाढवली आहे.
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या B.1.1.529 नवीन प्रकाराचे आत्ता पर्यंत 22 रुग्ण आढळलेले आहेत.
पुढील माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Nice app 👍