द पॉईंट प्रतिनिधी : माजी मंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण प्रकरणापासून चांगलेच चर्चेत आहेत. या प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. हे मिटत नहीं तेच नुकतंच यांच्याविरोधात एका महिलेने “पतीला नोकरीस लावून देतो त्याबदल्यात शरीर सुखाची मागणी” केल्याची गंभीर तक्रार महिलेने केली असून त्याची चौकशी आता यवतमाळ पोलिस करत आहे. पतीला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांनी शरीरसुखाची मागणी केली होती, असे या पत्रात म्हटले आहे. यवतमाळ पोलिसांना पत्राद्वारे ही तक्रार मिळाली आहे. त्याचा तपास करत असल्याचे यवतमाळचे पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी सांगितले.
महिला नेत्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री आ संजय राठोड यांनी एका महिलेला, तिच्या पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार संबंधित महिलेने घाटंजी पोलिसांना स्पीड पोस्टाने पाठवल्याचे वाघ यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शिवसेना आमदार माजीमंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवलीये
त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असं ही त्यात म्हंटलंय pic.twitter.com/4ZFQU6NGHt— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 12, 2021

पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी असे पत्र घाटंजी पोलिसांना प्राप्त झाल्याचे सांगितले. त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे पोलीस अधीक्षक यांनी फोनवर माहिती दिली. त्यांनी कोणाच्या विरोधात तक्रार आहे, त्याचा उल्लेख केला नाही. असे वाघ यांनी ट्विट करून सांगितले.
राठाेड हे वंजारी समाजाचे कड्डावर नेते असून, ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात वनमंत्री हे महत्वाचे खाते त्यांच्याकडे होते. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप होऊन घरी बसावे लागले, राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केले. पूजा चव्हाणच्या फोनमधील संभाषण पोलिसांना तपासल्यानंतर त्यातील संभाषण हे राठोड यांचे असल्याचा दावा करणारे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
या प्रकरणाने राजकीय पिछेहाट झाल्यानंतर आता नवीन प्रकरण राठोड यांच्यासमोर उभे राहिले आहे. लवकर राठोड मंत्रिमंडळात परततील अशी चर्चा असतांना हे प्रकरण बाहेर आल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम