‘संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक आहे’

0
33

द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्र शासनाने किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्व विरोधी स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे.

भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावरून त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यावरून अजित पवार, संजय राऊत अशा सर्वच नेत्यांनी, वाईन म्हणजे दारू नाही. महाविकास आघाडी सरकारला हे बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.

आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक असल्याचा आरोप केला आहे. राऊत यांची वाईनचा व्यवसाय असणाऱ्या उद्योजकासोबत पार्टनरशिप असल्याचा आरोप केला आहे.

कदाचित त्यामुळेच संजय राऊत महाविकास आघाडी सरकारच्या किराणा दुकानांमधून वाईन विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. असे तर सोमय्या यांना म्हणायचे नाही ना? असा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे.

आता सोमय्या यांच्या या आरोपावर राऊत काय उत्तर देतात? हे लवकरच दिसेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here