संजय राऊतांची ‘गुगली’ भाजपला महागात पडणार?

0
52

द पॉईंट नाऊ ब्युरो : सध्या बऱ्याच ठिकाणी निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राजकारण तापू लागले आहे. आणि यात शिवसेना भाजपला गोचित पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

गोवा राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. आणि इथे गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर आणि भाजप मध्ये वेगळेच शीतयुद्ध रंगलेले दिसत आहे.

भाजपने उत्पल पर्रीकर यांना तिकीट दिले मात्र ते पणजीचे नाही. आणि आपण निवडणूक पणजी मधूनच लढणार अशी घोषणा उत्पल पर्रीकर यांनी केली आहे.

दरम्यान यात शिवसेनेचा सहभाग असा की, शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, गोव्यात भाजपच्या विस्तारात पर्रीकर कुटुंबाचा मोठा वाटा आहे. उत्पल पर्रीकर पणजी मधून स्वतंत्र लढले, तर आपण त्यांना पाठिंबा देऊ. यामुळे एक प्रकारे शिवसेना एक हुकमी एक्काच आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

संजय राऊत यांच्याद्वारे टाकली गेलेली ही गुगली भाजप कशा प्रकारे खेळून काढते? की क्लीन बोल्ड होते? हे बघणे औत्सुक्याचे आहे. अर्थात, जर उत्पल पर्रीकर यांना भाजपने पणजीतून तिकीट नाहीच दिले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बोलण्याने जर उत्पल पर्रीकर यांच्या मनाचा ठाव घेतला, तर भाजपला हे गोवा निवडणुकीत महाग देखील पडू शकते. कारण उत्पल पर्रीकर यांच्या बाजूने मोठा समर्थक किंबहुना मतदार वर्ग आहे. आणि त्यांना भाजपने पणजी मधून तिकीट न दिल्यास व ते स्वतंत्र लढल्यास भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो.

त्यात शिवसेना देखील राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन गोव्यातून निवडणूक रिंगणात आहे. आणि राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांच्या आडून भाजपला फेकलेली गुगली भाजपला दणका देऊ शकते, यात नक्कीच शंका नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here