शिवसेनेचे खासदार भाजपच्या जनाशीर्वाद यात्रेत ; शिवसैनिक चिंतेत

0
13

विरार प्रतिनिधी : आजपासून राज्यात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशिर्वाद
यात्रा सुरू झाल्या. आज सकाळी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला असतानाच दुपारी मात्र शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी तलासरी येथे जाऊन मंत्र्यांची भेट घेतल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

सकाळपासून पालघर जिल्ह्यात जनाशीर्वाद यात्रा सुरु झाली असून , त्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ह्या या यात्रेत सहभागी झाल्या होत्या, त्यांच्या बरोबर विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हेही या सामील झाले. या यात्रेच्या निमित्ताने पालघरमध्ये आलेल्या भारती पवार यांनी राज्य सरकारला टार्गेट केले असतानाच दुपारी मात्र शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी केंद्रीय राज्य मंत्र्यांची भेट घेतल्याने या शिवसेनेत खळबळ उडाली आहे. व विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.

खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे आजच्या घटनेबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, एक आदिवासी खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून भरती पवार ह्या प्रथमच पालघर जिल्ह्यात आल्याने आपण त्यांना भेटायला गेलो होतो यात कोणतेही राजकारण नव्हते. पालघर जिल्हा आणि वसई- विरारमध्ये लसीचा असलेला तुटवडा आणि आरोग्याचे प्रश्न मी त्यांच्यासमोर ठेवले. मी कोणत्याही यात्रेत गेलो नव्हतो. असे स्पष्टीकरण गावित यांनी दिले.

पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील वनवासी कल्याण केंद्रात गावितांनी प्रवीण दरेकर आणि भारती पवारांची भेट घेतल्याने जिल्ह्यात उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी गावित हे भाजपचे खासदार राहिले आहेत. गावित हे 2019 पूर्वी भाजपचे खासदार होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या पक्षाचे खासदार झाले. त्यामुळे त्यांची भाजपशी आधीपासून जवळीक आहे. त्या आधी ते काॅंग्रेसमध्ये होते. चिंतामणी वणगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ते प्रथम भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते शिवसेनेत गेले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here