शरद पवारांचा महाविकास आघाडी निवडणुकीत मंत्र्यांना एकत्र येण्याचा सल्ला

0
8

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची, पदाधिकाऱ्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. 4 मे रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री व खासदारांची बैठक पार पडली.

सर्वोच्च न्यायालयाने पुढील 2 आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करा, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर, शरद पवार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. खासदार, मंत्री, आमदार यांना स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी निवडणुकांसाठी एकत्र येण्याची चर्चा या बैठकीत झाल्या आहे .

ओबीसी आरक्षण मिळावे ही महाविकास आघाडीची भूमिका होती याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील असेही असे शरद पवार म्हणाले आहे. कायदा व सुव्यवस्था टिकावी यासाठी आवश्यक ती खबरदारी व काळजी घेण्याची गृहमंत्र्यांनी व्यवस्था केली होती. राज्यात सुरू असलेल्या भोंगा वादावरही त्यांनी भाष्य करण्यात आले. ईदच्या निमित्ताने आणि भोंग्यावरील वादामुळे राज्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता, शांतता राखणाऱ्या राज्यातील जनता आणि तैनात असलेल्या पोलिसांच पवार साहेबांनी आभार मानले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here