विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबत राज्यपालांची भेट

0
44

द पॉईंट नाऊ ब्युरो : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक संदर्भात नुकतीच महाविकास आघाडी सरकार च्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. त्यावर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. ही अध्यक्ष पदाची निवडणूक दोन दिवसांत पार पडावी याबाबत राज्यपालांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत या निवडणुकीबाबत निवेदन दिले. राज्यपालांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला.

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने ठाकणार आहेत. भारतीय जनता पक्ष देखील आपला उमेदवार या निवडणुकीत उतरवणार आहे. यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, सर्व कायदेशीर बाबी तपासून याबाबत आपण निर्णय कळवू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

आता राज्यपाल याबाबत काय निर्णय घेतात? निर्णय कधी घेतात? याकडे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here