वसंत मोरे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार का? वसंत मोरे यांनी स्पष्ट केली भूमिका

0
40

राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. आमदार रोहित पवार आणि मनसेचे वसंत मोरे यांची एका कार्यक्रमात भेट झाली. यावेळी चर्चेला उधाण आले आहे.अनेक राजकीय अंदाज बांधले जात असून वसंत मोरे यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सध्याच मनसेचे पदाधिकारी आणि मोरे यांच्यात फारसे जमत नसल्याची चर्चा आहे. परंतु रोहित पवार हे वसंत मोरे यांच्या भेटीमागे वसंत मोरे यांनी सांगितलं की, रोहित पवार म्हणाले, तात्या तुम्ही अतिशय चांगली भूमिका घेतली तुम्ही मनसेत राहिलात” मला कोणतीही ऑफर दिलेली नाही. मी रोहित पवार यांना म्हणालो की, मी माझी भूमिकाच बदलली नव्हती, मी अगोदरपासूनच सांगितलं आहे की, की मनसेत आहे आणि मनसेतच राहणार, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.

वसंत मोरे लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याची चर्चा जोरदार होताना दिसून येत. परंतु मनसेचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी स्पष्ट विरोध करून आपली प्रतिक्रिया दिली. वसंत मोरे मनसेतच राहून काम करणार आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे दौऱ्यात पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली तेव्हापासून मनसे कामाला लागली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here