देवळा प्रतिनिधी: तालुक्यातील वरवंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली . तालुक्यात सद्या विकास सोसायटींच्या निवडणुकांमुळे राजकीय धुराळा उडाला आहे .
काही ठिकाणी दोन्ही तिन्ही गटाकडून समजोता घडवून आणला जाऊन निवडणुकाबिनविरोध पार पडल्या तर काही काही ठिकाणी समोरासमोर पॅनल उभे ठाकून तुल्यबळ लढती बघावयास मिळाल्या. वरवंडी विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकी साठी एकूण तेरा जागांसाठी तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने चौथ्यादा निवडणूक बिनविरोध पार पडली .
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे ;
सर्व साधारण गट –
संदिप दशरथ चव्हाण , आधार शंकर शिंदे , शांताराम रामदास चव्हाण , चिंतामण सुकदेव शिंदे , दौलत लाला आहेर , तुळशीराम महादु वाघ, गंगाधर नामदेव वाघ , देवाजी मणिराम चव्हाण
महिला प्रतिनिधि – सुशिला शांताराम चव्हाण , शकुंतला नानाजी पवार.
इतर मागासवर्गीय – दशरथ पुंडलिक बनकर,
अनुसूचित जाती जमाती गट – बाळु नारायण बच्छाव ,
भटक्या विमुक्त जाती गट , मोतीराम दामू गोसावी याप्रमाणे असून, एकोप्याने निवडणुक बिनविरोध पार पडल्याने गावात एकीचा संदेश बघावयास मिळाला .
नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . याकामी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , शिवाजी शिंदे ,अमलोक शिंदे , विठ्ठल चव्हाण , बापु चव्हाण ,रावसाहेब वाघ , लक्ष्मण शिंदे, सरपंच आबा शिंदे , विलास शिंदे , शांताराम चव्हाण ,भारत वाघ , सदाशिव शिंदे समाधान पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बच्छाव, भाऊसाहेब चव्हाण आदींनी परिश्रम घेतले .दरम्यान येथील देवगड शिवप्रतिष्ठानच्या वतीने नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम