द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : खासदार नवनीत राणा यांचा काही दिवसापूर्वीपासून चालू असलेल्या हनुमान चालिसा वाद प्रकरणातून तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना मुंबईमधील लीलावती रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना एमआरआय करण्याकरिता रुममध्ये नेले असताना, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या एका फोटोमुळे नवनीत राणा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.
नवनीत राणा यांचे एमआरआय करत असतानाचे फोटो काढल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी हा गुन्हा अज्ञात व्यक्तिविरोधात नोंदवला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन याविषयी निवेदन दिलं होतं. एमआरआय करत असताना मशिनजवळ कॅमरा घेऊन जाऊ शकत नाही, तर मग फोटो कसे काढण्यात आले यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यानंतर अज्ञात व्यक्तिविरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एमआरआय मशिनजवळ कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाता येऊ शकत नाही, असा नियम आहे. तरी देेखील नवनीत राणा यांचे फोटो काढण्यात आले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेकडून हा मुद्दा उचलून धरण्यात आला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम