रेशन कार्ड धारक असलेल्या सर्व सामान्यांनसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटयात जास्त भर देण्याचा निर्णय घेतला आहे. गोरगरीब जनतेला पोटभरण्या करता गहू आणि तांदूळ मिळत असल्याने दिलासा होता. परंतु आता गहूचे प्रमाण कमी केल्याने मोठा फटका बसणार आहे.
अनेक राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. हा बदल अनेक राज्यांत आणि काही केंद्र शासित प्रदेशांत केला आहे. यामुळे रेशन कार्ड धारकांना पूर्वीच्या तुलनेत कमी गहू मिळेल. तर 25 राज्यांच्या कोट्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यातील 14 लाख शिधापत्रिका धारकांना जूनपासून प्रति युनिट 3 किलो गव्हा ऐवजी 1 किलो गहू मिळणार आहे. तांदूळ 2 किलोऐवजी 4 किलो देण्यात येईल.
केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे ते सप्टेंबरपर्यंत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी अंतर्गत बिहार, केरळ आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांना मोफत वितरणासाठी गहू दिला जाणार नाही. याशिवाय, दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. गेव्हाचा घटलेला कोटा तांदळाने भरून काढण्यात येणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम