रुपाली पाटील-ठोंबरे यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 कार्यकर्त्यांविरोधात पुण्यातील गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर रूपाली पाटील या ट्रोल करणार्यांविरोधात आक्रमक शब्दात व्यक्त केला आहे.
रूपाली पाटील यांनी आपल्या कठोर शब्दात टीकाकारांना सुनावला आहे. कायदेशीर कारवाई करूनही जर ट्रोलरस ऐकत नाही तर त्यांना जशास तसं उत्तर देणार तसेच ट्रोल केल्याने मला फरक पडत नाही. मी ग्रेट लीडर आणि दमदार स्वतःच संरक्षण करणारी लीडर आहे. पुढील काळात मी आमदार होणार, मुख्यमंत्री अन् प्रधानमंत्रीही होणार असल्याचा विश्वासही रूपाली पाटील ठोंबरे व्यक्त केला..
रुपाली पाटील म्हणाल्या, मनसेतील नेत्यांच्या आशीर्वादानेच मला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मी माझ्या कामामुळे फेसबुकवर प्रसिद्ध आहे. त्याचाच त्रास मनसेच्या कार्यकर्त्यांना होतो. त्यामुळे मला अशाप्रकारे पातळी सोडून ट्रोल केलं जातं. मनसेत महिला कुठे आहेत. काम करून फेसबुकवर टाकणारी महिला मीच होते.
राष्ट्रवादीत पदार्पण केल्यान ते त्यांना पचनी पडत नाही, त्याचा त्यांना त्रास होतो आणि त्यामुळेच मला फेसबुक अध्यक्षा म्हटलं जातं, परंतु अशाप्रकारे हिनवल्यामुळे मला काहीही फरक पडत नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. फेसबुकवर एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत बदनामी करण्यात आली. त्यानंतर रूपाली पाटील या आक्रमक झाल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम