द पॉईंट प्रतिनिधी: देशाच्या संसदेत संसदेच्या इहितासात कलंक लावणारा गंभीर प्रकार घडला आहे. राहुल गांधी चुकीच्या पद्धतिने वागले असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे. असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
विरोधकांना गांभीर्य नाही, सरकारने अनेकवेळा चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधक तयार नव्हते, यामुळे चर्चा करून दिली नाही हा आरोप चुकीचा आहे. राहुल गांधीनीनी आरोप केला की भाजपा, आरएसएस संविधानाला दाबण्याचा काम करत आहे, यावर आठवले बोलतांना म्हणाले की सरकार सविधानच्या आधारावर काम करत आहे. विरोधक चुकीचे आरोप करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानासमोर डोके टेकवतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराचा भारत उभा करायचा आहे, सबका साथ सबका विकास हे धोरण त्यांचे आहे राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पार्टीची दुर्दैवी दशा झाली आहे. विरोधीपक्ष दंगा मस्ती करायची आहे,म्हणून संसदेत येते का ? संसदेत काम होऊ द्यायचे नाही आहे, काही लोकांना त्यानी पाठवले आहे, सतत तीन दिवस वेलमध्ये सदस्य येत असले तर वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे अशी मागणी आठवलेंनी केली आहे.
भारतात शांतता आहे मात्र काश्मीरमध्ये राहुल गांधीच्या सभे नजदीक बॉम्ब ब्लास्ट झाला, काश्मिरात बॉम्ब ब्लास्ट होत असतात, पण असे व्ह्यायला नको, सभा पंतप्रधानांची असों की राहुल गांधींची, या घटना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, आतंकवाद विरोधी कारवाई सुरू आहे,
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम