सटाणा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे कार्य हाती घेतले असून त्याचाच परिपाक म्हणून गाव तिथे राष्ट्रवादी संपर्क साधणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वतःच्या गावाला जाऊन गावकऱ्यांची बैठक घेऊन सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा करावी व गावकऱ्यांशी संवाद साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.
बागलाण विधानसभा मतदार संघाच्या माजी आ. दिपिका चव्हाण यांची राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आढावा बैठक सटाणा येथे राधाई मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी अॅड. पगार बोलत होते.
महिल्यांच्या हक्कांसाठी व सुरक्षतेसाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या माजी आमदार दिपिका चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देतांना केले.
शनिवार दि. ०५ फेब्रुवारी रोजी आपण स्वतः देखील मूळ गाव असलेल्या बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे जाऊन दुपारी १ वाजता गावकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे अॅड. रविंद्रनाना पगार यांनी सांगितले, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांना सभासद नोंदवून पक्षाच्या सुरु असलेल्या सभासद नोंदणीचा शुभारंभ यावेळी केला.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सामजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा किशोरी खैरनार, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, युवक तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, शहराध्यक्ष सुमित वाघ, अमोल बच्छाव, सनीर देवरे, महिला तालुकाध्यक्षा रेखा शिंदे, सुरेखा बच्छाव, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुयोग अहिरे, शहराध्यक्ष सागर वाघ, सुरेश पवार, वसंत भामरे, नानाजी दळवी, गणेश पवार, नितीन भामरे, संदीप अहिरे, किरण पाटील, चारुदत्त खैरनार, महेश शेवाळे, मेघदीप सावंत, सुजित बिरारी, संजय पवार, जयवंत सोनवणे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम