परभणी प्रतिनिधी : राज्यात महाविकासआघाडीत तीन पक्षांचे सरकार आहे. मात्र या तिघांमध्ये अनेक वेळा काही मुद्यांवरून मतभेद होत आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी आंचल गोयल (Collector Aanchal Goyal) यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील वाद (Dispute between Shiv Sena and NCP) चव्हाट्यावर आला आहे. गोयल यांच्या नियुक्तीवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पेटला आहे. शिवसेना खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गरज पडल्यावर माकडीणही तिच्या पिल्लाला बुडवते. आम्ही देखील राष्ट्रवादीला केव्हाही बुडवू, असं खळबळजनक वक्तव्य सेना खासदार संजय जाधव यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे राज्यांच्या राजकारणात महाविकासआघाडीत आलबेल नसल्याचे चित्र आहे.
खासदार संजय जाधव यांनी जालन्यात (Jalana) शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी भुजबळांना देखील टार्गेट केले आहे.
भुजबळांवर सेना खासदार जाधव भडकले..
भुजबळांवर टीका करतांना जाधव चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले , आम्ही प्रतिष्ठापणाला लावली. आयुक्तांकडे पत्र लिहिले. आयुक्तांनी आदेश दिले यांना दुकान बहाल करा. त्यानंतरही भुजबळ साहेबांनी पत्र दिले आणि म्हटले हे दुकान दुसऱ्यांना जोडा. जशी काय ही यांच्या बाबाची जहागीरच आहे. मग आमच्यासुद्धा भावना आनावर होतात, हे लक्षात ठेवा, असे खासदार संजय जाधव यांनी म्हटले आहे. यामुळे भुजबळांवर थेट हल्ला करून जाधव यांनी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम