राज्यपाल नियुक्त संभाव्य १२ आमदारांच्या यादीतून राजकीय नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.महाविकास आघाडीतील नेत्यांना मोठी धक्का देणारी बाब समोर आली. १२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी, एकनाथ खडसेंसह अन्य राजकीय नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दीड वर्षे राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची शिफारस करुन उलटली असून अजूनही कोणताही निर्णय झाला नाही. तर आता राजकीय नावे वगळण्यात सुरुवात झाली, आठवडाभरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नवी यादी पाठवण्यात येणार आहे. आता नवीन यादीत कोणत्या नेत्यांची नावे असतील याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय पार्श्वभूमी असलेली नावे वगळून नवी यादी राज्यपालांना पाठवण्यात येणार असल्याचे समोर आले.
प्रामुख्याने भाजपतून राष्ट्रवादीत गेल्यावर एकनाथ खडसेंचा आमदारकीची वाट मोकळी होणार होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे नाव बाजूला पडणार आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आगामी निवडणुकीत संधी मिळेल, अशी चर्चा आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नावांना राज्यपाल कोश्यारी यांचा विरोध असल्याचे म्हटले जात आहे. काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत शरद पवारांनी पंतप्रधानांकडे राज्यपाल नियुक्त सदस्यासंदर्भात चर्चा केली. यावरच पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम