द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्यात केंद्रीय मंत्री (minister) नारायण राणे (Narayan Rane) विरुद्ध शिवसेना हा सामना जोरदार रंगलाय. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा नुकतीच पार पडली. जनआशीर्वाद यात्रेमध्ये नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackaray) बोचरी टीका केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात शिवसेना, भाजप आमने सामने आले होते. जनआशीर्वाद यात्रेनंतर कोकणात राणेंना धक्का सेनेने दिला . देवगडचे दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या दोन्ही नगरसेवकांनी शिवबंध हाती बांधले आहे.
देवगडच्या भाजप नगरसेविका हर्षदा ठाकूर(Harshda thakur) आणि नगरसेवक विकास कोंयडे (vikas Koyande) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला. यामुळे राणेंना चांगलाच धक्का बसला आहे.
हर्षा ठाकूर आणि प्रकाश कोंयडे हे दोन नगरसेवक शिवसेनेत आलेत. नितेश राणे आणि त्यांचे वडील यांचे कोकणात फक्त स्वागत झाले. जनआशीर्वाद त्यांना मिळाले नाही. जनआशीर्वाद यात्रा हीच येड्यांची जत्रा होती, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. यामुळे नाईक विरुद्ध राणे हा सामना पुन्हा कोकणात दिसण्याची चिन्हे आहेत.
भाजपा राणेंच्या आहरी गेले आहे. त्याला कंटाळून मी शिवसेनेत प्रवेश केला. 5 वर्ष मी भाजप ची नगरसेविका आहे. त्याआधी मी पंचायत समिती सदस्य होते. घाणेरडे राजकारण भाजपमध्ये केले जाते त्याला कंटाळून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत मला नक्की न्याय मिळेल, असे नगरसेविका हर्षदा ठाकूर यांनी सांगितले. राणे यांच्या अधोपतनाची ही सुरुवात आहे. कोकणात भाजपमध्ये नाराजी आहे. आणखी भाजप चे कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असे सतीश सावंत यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम