जळगाव प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा लाडू भेटल्यामुळे त्यांनी बोलणे गरजेचे आहे. त्यांना शिवसेनेवर बोलण्याकरता मंत्री पद मिळाले आहे. यात्रेतील खेळण्याला चावी दिली की ते जोरात चालत. तस हे खेळणं आहे. याला चावी भरली की हे सुसाट चालत, याला चावी भरल्याशिवाय हे खेळणे हलत देखील नाही. अशी बोचरी टीका राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना केली.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात 2 कोटी 4 लाख 50 हजार किंमतीचे ऑक्सिजन जनरेशन प्लांटचा भूमिपूजन सोहळा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
काय म्हणाले होते राणे….
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अधिकाऱ्यांशी बोलतांना जीभ घसरली होती. मुख्यमंत्र्यांनी लोकांना तत्काळ मदत केली पाहिजे होती, पण या राज्यात मुख्यमंत्रीपण नाही आणि प्रशासनही नाही. चिपळूणमधील लोकांचे स्थलांतर केले नाही. जेवणाची व्यवस्था केली नाही, मग प्रशासन काम करते, असं कसं म्हणायचे ? चिपळुणातील प्रशासन बेजबाबदार पणे वागत आहे. एक केंद्रीय मंत्री असताना सोबत राज्याचे विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना पूरग्रस्त पाहणी दौऱ्यामध्ये एकही अधिकारी उपस्थित राहत नाही. आढावा बैठकीला एकही अधिकारी उपस्थित नाही, यामुळे राणे चांगलेच भडकले होते. त्यावर आज राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टिकेवर बोलते केले. यावेळी पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.
प्रशासन मैदानात विरोधकांनी दृष्टिकोन बदलावा….
पालकमंत्री पाटील म्हणाले, की राज्य चालविता येत नसेल व प्रशासन नाही असे म्हणणे पुर्णतः चुकीचे आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी रात्र न दिवस मैदानात आहेत , ते काम करत आहेत त्यांचे काम बघण्यासाठी विरोधकांनी आपला दृष्टिकोन बदलावा. जेणेकरून त्यांना सरकारच काम दिसेल, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, प्रांत जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन हे मदतकार्य करीत आहेत. नारायण राणे यांचे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने कोरोना आला; तर मग कोकणात पाऊसही भरपूर आला असे म्हणायला काय हरकत आहे. यावर एकच हशा झाला. विरोधकांनी परिस्थितीचे गांभीर्य राखावे असेही पाटील म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम