खासदार नवनीत राणा मुंबईत येणार असल्याची शिवसैनिकांना लागली कुणकुण विरोधासाठी पूर्ण तयारी सुर. नवनीत राणा यांचा विरोध करण्यासाठी शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात जमले होते.
विदर्भ – एक्सप्रेसने खासदार नवनीत राणा येणार असल्याची शिवसैनिकांना भनक लागली . त्यानंतर महिला शिवसैनिक या मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गोळा झाल्या. 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालीसा पठण करणार. त्यांच्यासोबत सुमारे 600 हून अधिक कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमणार असणार. त्यामुळे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मातोश्री बाहेर मोठा फौजफाटा तैनात केला असून बॅरिकेडिंग केलं आहे.
नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करणार असे आव्हान शिवसेनेला केले आहे. राणा मुंबईत आल्यास त्यांना विरोध करणार असे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे. मातोश्रीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आणखी शिवसैनिक जमा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे इथे यायची कोणी धमकी देत असेल तर शिवसैनिक शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया मातोश्री बाहेरील जमलेल्या शिवसैनिकांनी दिली आहे. राणा दाम्पत्यांनं मुंबई येऊन दाखवावं, असे आव्हान शिवसैनिकांनी दिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम