मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे, औरंगाबाद येथे जाहीर घेतल्या. 21 मे रोजी पुण्यात होणारी जाहीर सभा अचानक रद्द केली आहे. राज ठाकरे यांची शनिवारी मुठा नदी पात्रात सभा होणार होती. २१ ते २८ मे दरम्यान त्यांचा पुणे दौरा होणार असून सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली.
आगामी निवडणुका लक्षात घेता जागोजागी राज ठाकरे यांची गर्जना होत आहे. राज ठाकरे पुण्यातील मनसैनिकांना संबोधित करण्यासाठी पुण्यात जाहीर सभा घेणार होते. परंतु शनिवारी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने राज ठाकरे यांच्या सभेचा दिवस बदलण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिसांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्र पाठवून राज ठाकरे यांची सभा रद्द झाल्याचे कळविले आहे.
राज ठाकरे यांची प्रकृती ठिक नसल्याने ही सभा रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन दि.21मे रोजी डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रात होणार होती. परंतु रद्द करून येत्या दहा दिवसांच्या आत राज ठाकरेंची सभा पुण्यात होईल. राज ठाकरे स्वतः पुण्यातील सभेबद्दल महिती देतील असे सांगितले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम